चंद्रभागा शुद्धीकरणासाठी जपानी ई एम् तंत्रज्ञानाचा वापर पद्मभूषण डॉ विजय भटकर यांचा पुढाकार

.पंढरपूर      चंद्रभागा शुद्धीकरणासाठी आता जपानी  ई एम् तंत्रज्ञान येणार असून या माध्यमातून जुना दगडी पूल ते विष्णुपद मंदिर या भागातील नदीचे पाणी स्वच्छ व शुद्ध केले जाणार आहेत यासाठी जेष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ विजय भटकर त्यांनी पुढाकार घेतला आहे

  
  राज्य शासनाने चंद्रभागा शुद्धीकरणासाठी 2017 मध्येच नमामी चंद्रभागा म्हणून घोषणा केली होती यासाठी 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता चंद्रभागा शुद्धीकरणाची मोहीम पंढरपुरातून सुरू करण्यात आली होती सिंहगड कॉलेजमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस वनमंत्री सुधीर मुनगंटीवार तात्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले होते नंतर निधी अभावी अभावी हे काम रखडले आता राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्हा परिषदेला ग्रामपंचायतच्या माध्यमातून शुद्धीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे भीमा चंद्रभागा नदीला मिसळणारे सांडपाणी बंद करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत माध्यमातून सांडपाणी शुद्धीकरण करूनच पाणी सोडण्याबाबत प्रकल्प राबविण्यात येणार आहे
  चंद्रभागा शुद्धीकरणासाठी सुवर्ण कृषी संस्था व शाश्वत फार्मर्स या संयुक्त विद्यमाने ही मोहीम हाती घेतल्यात आली आहे यासाठी पद्मभूषण शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येणार आहे चंद्रभागा नदीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी नाशिक येथील शाश्वत फार्मसी येथे पाठवण्यात आले आहेत त्यानंतर त्या शुद्धीकरणासाठी जपानी तंत्रज्ञान इ एम या द्रावणाचा वापर शुद्धीकरणासाठी करण्यात येणार आहे  यापूर्वी पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे हा प्रकल्प राबवण्यात आला आहे यासाठी डॉ शिवाजी कांबळे माझी पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम त्यांच्याकडून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे