मंगळवेढा तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका समाविचार आघाडी करून लढणार, ---भगीरथ भालके , माजी आ परिचारक यांच्या उपस्थितीत सत्कार , आ अवताडे गटाला धक्का देण्याची तयारी सुरू

पंढरपूर . /आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या निवडणुका समविचारी आघाडी करून लढणार असल्याची घोषणा विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी केली यावेळी माजी आ प्रशांत परिचारक उपस्थित होते या घोषणेमुळे आ समाधान आवताडे गटाला धक्का देण्याची सुरू केला समजते
. गेल्या वर्षी मंगळवेढा तालुक्यातील दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आ समाधान आवताडे यांच्या विरोधात भगीरथ भालके माजी आ प्रशांत परिचारक यांची समविचारी आघाडी करून ही निवडणूक जिंकली होती अवताडे गटाला मोठा धक्का बसला नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये १८ पैकी १३ ग्रामपंचायत समविचारी आघाडीने जिंकले आहेत म्हणजे परिचारक भालके गटाने
या ग्रामपंचायतीची सरपंच आणि उपसरपंच सदस्यांचा सत्कार मंगळवेढा तालुक्यातील करण्यात आला यावेळी भगीरथ भालके बोलत होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रशांत परिचारक दामाजीचे चेअरमन शिवानंद पाटील व्हाईस चेअरमन तानाजी खताळ राष्ट्रवादीचे नेते लतीफ तांबोळी ग्रामस्थ उपस्थित होते
भगीरथ भालके यांनी दामाजी कारखान्याच्या कामगिरीचं कौतुक केले सर्वसामान्य सभासदांना न्याय देण्यासाठीच आम्ही समविचारी आघाडी कोणीही निवडणूक लढवली कारखान्याचा आलेख वाचून दाखवला त्या पुढील काळात जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या निवडणुका ही समविचारी आघाडी करूनच लढवणार असल्याचे घोषणा केली यावेळी त्यांनी आमदार आमदार अवताडेंवर टीकास्त्र सोडलं सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडायचे जात नाहीत अधिकाऱ्यांना वेठीस धरण्यात लोकप्रतिनिधी धन्यता मानतात अशी टीका त्यांनी केली . यामुळे आता आमदार अवताडे गटाला धक्का देण्यासाठी तयारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे पांडुरंग परिचारक गटाने समती दिली असल्याचे समजते. स्थानिक पातळीवर आघाडी करून निवडणुका लढणार असल्याचे समजते


