"सील" केलेले दुकानातील औषधे मालकाने चोरला , करकंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ,' कृषी व्यापारात खळबळ

.पंढरपूर  / करकंब     बनावट औषध प्रकरणी तालुक्यातील करकब येथील ओंकार कृषी केंद्र  "सील" केले होते परंतु दुकान मालकाने बेकायदेशीरपणे दुकान उघडून त्यातील ३  लाख ३१ हजार रुपयांचा माला  चोरीला गेला  आहे याप्रकरणी दुकान मालक संजय पवार व त्याचा मुलगा ओंकार पवार यांच्याविरुद्ध करकंब  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे परिसरात खळबळ उडाली
  याबाबत करकंब पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की ओमकार कृषी केंद्र   शेतकऱ्यांनी  द्राक्ष  मधील  तण नाशक औषधे  साठी फवारणी परिसरातील ९ते१०  शेतकऱ्यांना दिले होते मात्र हे औषध बनावट निघाल्याने त्या शेतकऱ्याच्या द्राक्ष बागा जळून गेल्या .यावेळी तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे यांनी द्राक्ष फवारणीचे तन नाशक औषध असे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीस पाच नोव्हेंबर 2022 पाठवले होते त्यानंतर हे औषध बनावट असल्याचा अहवाल आल्यानंतर 18नोव्हेंबर 2022 रोजी ओंकार कृषी केंद्र व त्याचे गोडाऊन कृषी अधिकारी ,सील" केले होते तसेच करकंब पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद करण्यात आला होता
    ओंकार कृषी केंद्र व त्याचे गोडाऊन सील केल्यामुळे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचा पुढील आदेश येईपर्यंत दुकान उघडण्यास मनाई केली होती .परंतु ओंकार कृषी केंद्राचे मालक संजय पवार व त्यांचा मुलगा ओंकार पवार यांनी १४जानेवारी २०२३ रोजी दुकानाचे व गोडांचे सर्व घडून यातील सुमारे तीन लाख 31 हजार रुपयांचा कृषी औषधे चोरीला गेली असल्याची फिर्याद तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे यांनी त्यांनी करकंब पोलीस ठाण्यात दिले असून दुकानाचे मालक संजय पवार व यांचा मुलगा ओंकार पावलांच्या विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे कृषी व्यापारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे .