आता पैलवान होणार 'मालामाल' ;.राज्य शासनाकडून पैलवानांच्या 'मानधनात' भरघोस वाढीची घोषणा..

पंढरपूर .पैलवान होणार मालामाल खुराकासाठी भरघोस मानधनात वाढ
कुस्ती हा आपला महाराष्ट्र राज्याचा खेळ असून या कुस्ती पैलवानांना राज्य शासनाकडून तुटपुंज मानधन दिले जात होते राज्य कुस्ती परिषदेने अध्यक्षां मानधन वाढ करण्याची मागणी केली होती
मागील आठवड्यात पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र कुस्ती परिषदेच्या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी राष्ट्रीय पातळीवर कुस्ती जिंकणाऱ्या पैलवान तसेच हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी ,या पैलवानासाठी मानधनात ६ हजारावरून 20 हजार रुपये वाढ केल्याची घोषणा त्यांनी केली तर प्रशिक्षकांना २५०० हजारावरून ७५०० हजार रुपये मानधन वाढवण्यात आले आहे. यामुळे आता पैलवान होणार मालामाल खुराक कमी पडणार नाही .
कुस्ती हा देशी खेळ असून या खेळाला प्राधान्य देणे आणि राजा श्रेय देणे राज्य सरकारचे काम आहे या पुढील काळात कुस्तीला सर्वतोपरी राज्य शासन मदत करेल ऑलम्पिक मध्ये महाराष्ट्राचा पैलवान असेल असे त्यांनी सांगितले खाशाबा जाधव यांनी पहिले कुस्तीतील ऑलिम्पिक सुवर्ण पदक मिळवून दिले होते त्याच धर्तीवर आता येत्या ऑलम्पिक मध्ये महाराष्ट्रातील पैलवान ऑलिम्पिक तयार रहावे असे आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे


