पंढरपूर तालुक्यातील १८५४ नियमित कर्जफेड शेतकऱ्यांना ८ कोटी ७६ लाख रुपये मंजूर

.

 

 पंंढरपूर   -राज्यात सहा महिन्यापूर्वी सेना भाजप सरकार आले आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची ५०  हजार रुपये ज्या शेतकरी  मंजूर केले त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातील ७२२०  शेतकऱ्याचे प्रस्ताव पाठवण्यात आले होते त्यापैकी फक्त  १८५४ शेतकऱ्यांना  ८ कोटी  ७६  लाख रुपये मंजूर झाले आहे 
   राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने येतात नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना  ५०  हजार रुपये अनुदान देण्यावर घोषणा केली त्यामध्ये पहिल्या टप्प्यात २३५०  कोटी रुपये अनुदान मंजूर केले होते जो शेतकरी नियमित कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांनाही अनुदान देण्यात येणार असल्याचे सांगितले तीन वर्षांमध्ये दोन वर्ष नियमित कर्ज  फेड केले आहे    अशा शेतकऱ्यांना दिला  जाणार आहे 
 पंढरपूर तालुक्यात नेहमी कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या  ७७२०त्यापैकी  ३२६० शेतकऱ्यांचे आधार अपलोड ची मंजुरी आली आहे मात्र प्रत्यक्षात १८५४  शेतकऱ्यांना ८  कोटी ७६ लाख रुपये मंजूर झाले आहेत असल्याची माहिती    पंढरपूर चे सहकार सहाय्यक निबंध प्रमोद दुर्गुडे यांनी दिली