दरम्यान डॉ.मडके यांनी, पंढरपूर अर्बन बँकेस ११० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन केले तसेच व्याख्यानमाले सारखा उपक्रम ३५ वर्षा पासून सुरू असल्याबद्दल कौतुक केले.

maharashtra

दरम्यान डॉ.मडके यांनी, पंढरपूर अर्बन बँकेस ११० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन केले तसेच व्याख्यानमाले सारखा उपक्रम ३५ वर्षा पासून सुरू असल्याबद्दल कौतुक केले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला बँकेचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी, पंढरपूर अर्बन बँकेला ११० वर्षे पूर्ण होत असून बँकेची पहिल्या पासून सभासदांशी प्रेमाची, विश्‍वासाची नाळ जुळली असल्याचे सांगितले. कोरोनामुळे मानवी जीवनावर नव्हे तर संपूर्ण समाजव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. याबाबत सभासदांना माहिती मिळावी यासाठी सदर व्याख्यानाचे आयोजन केले असल्याचे सांगितले.  
       यावेळी डॉ.अनिल मडके यांचा सत्कार बँकेचे चेअरमन श्री.प्रशांत परिचारक यांचे हस्ते तर डॉ.अनिल जोशी यांचा सत्कार बँकेचे व्हा.चेअरमन दिपक शेटे यांचे हस्ते करणेत आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बँकेचे संचालक शांताराम कुलकर्णी यांनी केले तर आभार विनायक हरिदास यांनी मानले.
याप्रसंगी बँकेचे संचालक उदय उत्पात, चंद्रकांत निकते, रजनीश कवठेकर, पांडुरंग घंटी, सतीश मुळे, शांताराम कुलकर्णी, विनायक हरिदास, भाऊसाहेब जगताप, सोमनाथ होरणे, सौ.माधुरीताई जोशी, सौ.रेखाताई अभंगराव, मुन्नागीर गोसावी, रामचंद्र माळी, मनोज सुरवसे, तज्ञ संचालक प्रकाश कुलकर्णी,  पांडुरंग कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास खुळे, दिनकरभाऊ मोरे, दाजी भूसनर आदी मान्यवर तथा बँकेचे सरव्यवस्थापक राम उन्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
रविवार दि.19 नोव्हेंबर रोजी मध्यवर्ती गणेशोत्सव व नवरात्रौत्सव मंडळातील विजेत्या मंडळांचा पारितोषिक वितरण समारंभ बँकेचे चेअरमन श्री.प्रशांतराव परिचारक व जिल्हा उपनिबंधक तथा सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक श्री.कुंदन भोळे यांचे शुभहस्ते संपन्न होणार आहे. तसेच यावेळी व्याख्यानमालेतील तिसरे व्याख्यान प्रसिध्द अभिनेते-दिग्दर्शक श्री.प्रवीण तरडे यांचे मराठी चित्रपट सृष्टी या विषयावर व्याख्यान होणार आहे. या प्रसंगी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी संचालक मंडळाचे वतीने करणेत आले.