श्री विठ्ठल रुक्मिणीचा "शाही विवाह' की , मंदिर समितीचा 'इव्हेंट' कार्यक्रम चर्चा रंगू लागली, "दर्शन रांगेतील भाविका तीव्र संताप

 पंढरपूर  /
वसंत पंचमी व प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर गुरुवारी दुपारी बारा वाजून 17 मिनिटांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा विठ्ठल मंदिरात लावण्यात आला. सुरुवातीला ह भ प अनुराधा महाराज शेटे यांनी रुक्मिणी स्वयंवर कथा सांगितली यानंतर सभामंडपात मत्स्य आकाराचा करण्यात आलेल्या मंडपात विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा करण्यात आला .

यावेळी नियोजनाचा अभाव असल्यामुळे विवाह नंतर एकच गोंधळ उडाला देवाचा विवाह होता की मंदिर समितीचा "इव्हेंट" कार्यक्रम होता अशी चर्चा आता रंगू लागली आहे. . .  यावेळी  हजारो वऱ्हाडींनी उपस्थितीत मंगलाष्टका झाल्या त्यानंतर श्री विठ्ठलाची  आरती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदळवाड यांच्या हस्ते करण्यात आली. अक्षदा फुल देवाच्या अंगावर उधळण करून दर्शन घेतले विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती वतीने आलेल्या वऱ्हाडींना " शाही भोजन " देण्यात आले .विवाह समारमानिमित्त उमरगा येथून आलेल्या भाविकाने विठ्ठल रुक्मिणीस १ कोटी ७५ पंढरपूर ख रुपयांचे सोन्याचे दागिने भेट दिले या सोन्याचे मुख्य प्रकारचे दागिने
विठ्ठल रुक्मिणीच्या विवाह सोहळ्यानिमित्त मंदिरातील सभामंडप आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता तसेच माशाचा आकाराचा मंडप तयार करण्यात आला होता विवाह सोहळ इव्हेंट ठरला आहे विवाह समारंभ यशस्वी करण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतील अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते विवाह समारंभ झाल्यानंतर भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. मंदिर समितीचे अध्यक्ष ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगाव प्रकाश महाराज जंवजाळ अँड माधवी निगडे शकुंतला नडगीरे  कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे  उपस्थित होते. 

वसंत पंचमी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी चा विवाह मंदिरातील सभामंडपा येथे संपन्न झाला मात्र हा विवाह देवाचा होता की मंदिर समितीने एक प्रकारचा इव्हेंट कार्यक्रम साजरा केला अशी चर्चा आता होत आहे  सर्व भाविक सोहळ्यासाठी उपस्थित राहू शकले नाही या सोहळ्यासाठी "वशिल्याचे]" भावी मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे सर्वसामान्य भाविक विवाह सोहळ्यापासून" वंचित" राहिले दुसरीकडे विवाह सोहळा चालू असताना विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन बंद ठेवण्यात आले होते  त्यामुळे दर्शन रांगेतील भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता असा इव्हेंट बाहेर घ्यावा अशी मागणी आता भाविकातून होत आहे पुढील वर्षापासून विठ्ठल रुक्मिणीचा विवाह मंदिराबाहेर घ्यावा अशी आता मागणी होत आहे