सक्तीची "वीज वसुली" त्वरित थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू स्वाभिमानीचा इशारा

पंढरपूर . / वीज वितरण कंपनीने वीज बिलाची सक्तीची "वसुली त्वरित थांबवावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलनाचा करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष सचिन पाटील यांनी दिला आहे.
वीज वितरण कंपनी मागील थकबाकी पोटी वसूली साठी मोहीम सुरू केली आहे, ही त्वरित थांबवावी कोणत्याही शेतकऱ्याला पूर्व सूचना न देता वीज कनेक्शन तोडण्यात येत आहे, यासाठी वीज वितरण अधिकारी महसूल अधिकारी शेतकरी संघटना शेतकऱ्यांची ग्राम पातळीवर एक बैठक घ्यावी समन्वय ठेवून काम करावे. शेतकऱ्यांना सूचना द्या मुदत द्या पैसे भरायला, नंतर ते बाकी थेट वीज कनेक्शन तोडणे हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे . नुकसान झाल्यावर जबाबदार वीज वितरण, आणि शासन ,असेल असा आरोप त्यांनी केला आहे.
सध्या शेतात ऊस, द्राक्ष, केळी, बोर डाळिंब तसेच रब्बी हंगामातील गहू, हरभरा ,हे पिके अंतिम टप्प्यात काढणीला आले आहेत. अशा वेळेस वीज कनेक्शन तोडणे शेतीला पाणी जनावराच्या पिण्याच्या पाण्याची अडचण होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे त्वरित सक्तीची वसुली थांबवा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्या पद्धतीने वीज वितरण कार्यालयात" घुसून हिसका' दाखवेल असा इशारा त्यांनी तहसीलदार सुशील बेलेकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावी शेतकरी संघटनेचे तानाजी बागल गोरख चव्हाण प्रकाश माळीपदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


