पुढील आठवड्यात "पंढरपूर कॉरिडोला" संदर्भात पायाभूत सुविधाचे प्रमुख "राधेश्याम मोपलवार" यांच्यासमवेत मुंबईत बैठक, , येत्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद होण्याचे संकेत..!

. पंढरपूर /वाराणसी व उज्जैनच्या धर्तीवर पंढरपुरात प्रस्तावित कॉरिडॉर संदर्भात बैठक मुख्यमंत्र्याचे कार्यालयाचे "वाँर रुमचे प्रमुख" "व पायाभूत सुविधा त्याचे प्रमुख ज्यांनी समृद्धी मार्गाचे केला वरिष्ठ माजी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या समवेत सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे येत्या अर्थसंकल्पात कॉरिडॉर संदर्भात तरतूद करण्यात येणार असल्याने समजते. प्रस्तावित पंढरपूरचा कॉरिडॉर २००० कोटीचा असून भूसंपादनासाठी सुमारे ५०० कोटी रुपये अपेक्षित असून व विकासासाठी ५०० कोटी रुपये असे प्रस्तावित केले आहे. नुकताच केंद्राचा अर्थसंकल्प झाला त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी देशात ५० ठिकाणी कॉरिडाँल करण्यात येणार असल्याची घोषणा केलेली आहे.
दरम्यान गेली पंधरा दिवस झाले पंढरपूर कॉरिडाँल संदर्भात कोणतीही बैठक झाली नाही मागील महिन्यात पालकमंत्री यांनी राधाकृष्ण विखे पाटील सोलापूर येथे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या होत्या की स्थानिक लोकप्रतिनिधी आ समाधान आवताडे , माजी आ प्रशांत परिचारक. व बचाव समितीचे सदस्य यांच्यासमवेत बैठक घेऊन सूचना घ्याव्या मात्र', अद्यापही याबाबतची कुठलीही बैठक लोकप्रतिनिधी बरोबर झाली नाही यामुळे बचाव समिती व्यापारी स्थानिक नागरिक संभ्रम अवस्थेत आहेत अधिकारी आणि लोकप्रतिनिधी कडून कुठलीही माहिती कॉरिडाँर संदर्भात दिली जात नाही.
दोन दिवसापूर्वी मुंबई येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये कॉरिडॉरल संदर्भात चर्चा आली , येणाऱ्या अर्थसंकल्प मध्ये पंढरपूरच्या कॉरिडाँल/ विकास आराखडा संदर्भात निधीची तरतूद करणार असल्याची चर्चा लागली आहे.
पुढील आठवड्यात मुंबई येथे मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव व पायाभूत सुविधांचे प्रमुख राधेश्याम मोपलवार पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची या संदर्भात बैठक होणार असून पंढरपूरच्या प्रस्तावित असलेल्या कॉरिडॉल आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे.
.या बैठकीत बाधित होणाऱ्या नागरीकांना/ व्यापारी यांना स्क्वेअर मीटर किती दर द्यायचा याचा निर्णय होणार असल्याचे समजते.
कारण राधेश्याम मोपलवार यांनी समृद्धी मार्गासाठी शेतकऱ्यांच्या समजूती काढून त्यांना जागा दर देऊन हा मार्ग पूर्ण केला आहे . त्यांना अनुभव असल्याने आता पंढरपूरच्या प्रस्तावित कॉरिडोर ची पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी राधेश्याम मोकळवार यांच्याकडे सोपवली असल्याचे समजते .


