ब्रेकिंग न्यूज ----विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती "तुळशी पूजा" नावाखाली "पेड दर्शन" सुरू करण्याचा "घाट", सर्वसामान्य भाविक महाराज मंडळीतून विरोध..!

. पंढरपूर  /लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात समितीच्या वतीने आता "तुळशी पूजा" च्या नावाखाली "पेड दर्शन" सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. यामुळे सर्वसामान्य भाविकातून तीव्र सांगतात व्यक्त होत आहे.
 दोन दिवसांपूर्वी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती बैठक भक्त निवास येथे सहअध्यक्ष ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी  कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे व्यवस्थापक बालाजी  पुदलवाड उपस्थित होते यावेळी त्यांनी येत्या "गुढी पाडव्या" पासून "विठ्ठलाची तुळशी पूजा" करण्यात येणार असून याबाबतचे देणगी मूल्य आणि निकष नियम लवकरच ठरवले जातील अशी माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. म्हणजे या माध्यमातून" पेड दर्शन" सुरू होणार आहे.
 सर्वसामान्य भाविकांच्या दर्शनाला वेळ लागणार असून या भाविकला रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार आहे. "धन दांडग्या'" भाविकासाठी "तुळशी पूजा" करण्यात येणार असून त्यामुळे म्हणजे  मंदिराचे  उत्पन्न वाढणार आहे. परंतु मंदिर समितीचे  उत्पन्न वाढवण्यासाठी नाही तर भाविकांना मूलभूत सुविधा देऊन सुलभ दर्शन करण्यासाठी नियुक्त केलेली आहे. "तुळशी पूजा" या माध्यमातून "पेड दर्शन" सुविधा उपलब्ध होणार असल्याची चर्चा आता होऊ लागली आहे. आताही मंदिर समिती नित्य पूजा च्या नावाखाली लाखो रुपये उत्पन्न मिळवत आहे. विठ्ठलाकडे २५००० हजार तर रुक्मिणीकडे ११००० देणगी मूल्य आहे वास्तविक पाहता "नित्य पूजा" महापूजा  हे मंदिर समितीचे कर्तव्य आहे ही भाविकांसाठी पूजा नाही तर "देवासाठी" पूजा आहे परंतु यातही मंदिर समितीचे काही सदस्यासह कर्मचाऱ्यांचे वशिलाची भाविकची पूजा  लावल्या असल्याची  चर्चा होत आहे. यापूर्वी समितीनेही "विठ्ठलाचे पेड" दर्शन  सुरू केले होते त्याला विरोध झाल्यामुळे ते रद्द  करण्यात  आले. वास्तविक पाहता या मंदिर समितीची मुदत संपून ६ महिने झालेले आहे. यामधील "अध्यक्षासह तीन सदस्य पद रिक्त" आहेत. म्हणून या मंदिर समितीला "धोरणात्मक" निर्णय घ्यायचा अधिकार आहे का अशी ही चर्चा भाविकातून होत आहे .शासनाने  ही मंदिर समिती त्वरित बरखास्त करून नवीन समिती नियुक्त करावी अशी मागणी आता भाविकातून होत आहे.
    [ दरम्यान   महाराज मंडळी , भाविक , या तुळशी पूजेला विरोध केला. असल्याचे समजते  लवकरच याबाबत सर्व माहिती घेऊन   बैठक घेणार असल्याची माहिती  वारकरी पाईक संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण महाराज वीर यांनी  दिली.]