सोलापूर विद्यापीठाच्या "कुलगुरूंनी ४० कोटीचा" गैरव्यवहार केला असून तसेच पंढरपूर येथील "विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाला" त्रास देण्याचे काम कुलगुरूंनी केले ,आ राम सातपुते यांचा विधानसभेत विधानसभेत आरोप

.पंढरपूर /सोलापूर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात "कुलगुरू"  यांनी ४० कोटींचा गैरव्यवहार केला  असल्याचा आरोप  आ राम सातपुते यांनी विधानसभेत केला तसेच तसेच "पंढरपूर येथील प्रा डाँ बी पी रोंगे यांचे विठ्ठल अभियांत्रिकी" महाविद्यालयाला नाहक त्रास देण्याचे काम कुलगुरूंनी केले . त्यावर यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. . दरम्यान उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी उच्च शिक्षण संचालक चौकशी समिती नियुक्त केली ,जाईल ३० एप्रिल पर्यंत याचा अहवाल देण्याचे माहिती त्यांनी सभागृहाला दिली..
 पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ गेल्या दोन-तीन वर्षापासून वादामध्येच सापडले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने यापूर्वीही "कुलगुरू" वर आरोप केले होते परंतु हे प्रकरण त्यांनी दाबले.   आज माळशिरसचे आ राम सातपुते यांनी विधानसभेचे याबाबत सोलापूर विद्यापीठा मध्ये सावळा गोंधळ आहे.  कोविडच्या काळात विद्यापीठाने ऑनलाईन पेपर तपासणीसाठी एका पेपर साठी ३५ रुपये दर ठरवण्यात आला. इतर विद्यापीठापेक्षा हा जर जास्त आहे यामुळे ८ कोटी रुपये खर्च दाखवले आहेत. तसेच केल्या पाच वर्षात ४० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याचे आरोप त्यांनी सभागृहात केला.या  विद्यापीठा बाबत अगोदरच विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या आहेत परीक्षा सुद्धा उशिरा घेतल्या अद्यापही त्यांनी निकाल लावलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे तीव्र संताप व्यक्त होत आहे असे लक्ष त्यांनी वेधले सोलापूर जिल्ह्यातील नामांकन  यादीत वर असलेले महाविद्यालय  प्रा डॉ बी पी रोंगे यांचे विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालय कुलगुरू यांनी त्रास देण्याचे काम केले त्यांनी न्यायालयातून परवानगी आणली तेव्हा त्यांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागली असेही त्यांनी सांगितले.
 दरम्यान उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या आरोपाची गंभीर दखल घेत असून उच्च शिक्षण संचालक यांच्या अध्यक्षेखाली समिती नियुक्त केली जाईल 30 एप्रिल पर्यंत त्याचा अहवाल देण्याचा सूचना त्यांनी केले आहेत. जो अहवाल  येईल  पुढील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी घोषणा त्यांनी सभागृहात केली.