ब्रेकिंग न्यूज ---विठ्ठल चे संचालक काळे सह सात जणांचे अपील साखर सहसंचालक फेटाळले, "पाटील रोंगे" गटाला धक्का ,
.पंढरपूर प्रतिनिधी - निवडणुक निर्णय आधिकाऱ्याने नामंजुर केलेला उमेदवारी अर्ज मंजुर करण्यासाठी अभिजीत पाटील गटाचे वतीने प्रादेशिक सह संचालक (साखर) सोलापूर यांचेकडे केलेले विठ्ठल चे संचालक काळे सह सात जणांचे अपील फेटाळले उमेदवारी नामंजुर केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांचा निर्णय कायम ठेवला असणार त्यांचे अपील साखर सहसंचालक यांनी फेटाळले आहेत
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे प्रक्रिया सुरु असून निवडणुक निर्णय आधिकारी यांनी अभिजीत पाटील गटाच्या विठ्ठल चे संचालक धनंजय उत्तम काळे, हणमंत महादेव बागल , पोपट माणिक पवार, योगेश बाळासाहेब होळकर, ज्ञानेश्वर निवृत्ती माने, दामोदर यशवंत चौगुले, रावसाहेब महादेव निकम, रमेश मधुकर नाईकनवरे यांचे उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय आधिकाऱ्यांना कारखान्याकडून मिळालेल्या माहिती प्रमाणे तांत्रिकबाबी लक्षात घेवून नामंजुर केले होते. हे अर्ज मंजुर करण्यासाठी पंढरपूर येथे निवडणुक निर्णय आधिकारी यांचे समोर झालेल्या सुनावणीत नामवंत वकील युक्तीवाद केले होते त्यानूसार हे अर्ज नामंजुर करण्यात आले होते. याच वेळी उमेदवारी अर्जावर हरकत घेतलेले ब्रबुवान रोंगे, दिपक पवार, कल्याणराव काळे यांचे अर्जावरही गैरअर्जदारांनी आक्षेप नोंदविले होते मात्र निवडणुक निर्णय आधिकारी यांनी वरील तीन अर्ज मंजुर केले होते.
नामंजुर अर्जदारांच्यावतीने सोलापूर येथील प्रोदशिक सह संचालक (साखर) विभाग यांचेकडे केलेल्या अपीलाची सुनावणी दि.२९ मे रोजी झाली यावेळीही अर्जदाराचे वतीने ॲङ भोसले व ॲङ रोंगे तर कारखान्याचे वतीने ॲड.राजेश भादुले यांनी युक्तीवाद केला. सुनावणी दरम्यान युक्तीवादानूसार अपीलय आधिकाऱ्यांनी वरील आठ उमेदवारांचे आपील साखर सहसंचालक सोलापूर यांनी फेटाळले
सदर घटनेमुळे अभिजीत पाटील गटाला धक्का बसला असून वरील उमेदवारांची उमेदवारी रदद झाली आहे उद्या ५ जून रोजी अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत असून कल्याण काळे अभिजीत पाटील गटाकडून पॅनल ची घोषणा होणार आहे.