अमृत योजनेअंतर्गत पंढरपूर रेल्वे स्थानकात आधुनिक करणार, उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

 पंढरपूर   / देशातील रेल्वे स्थानकात अत्याधुनिक सोयी सुविधा देण्यासाठी अमृतभारत स्टेशन ही योजना सुरू करण्यात आली आहे या अंतर्गत पंढरपूर रेल्वे स्टेशनचा समावेश करण्यात आला आहे विकास कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या रविवार दिनांक ६ ऑगस्ट रोजी ऑनलाईन करण्यात येणार आहे पंढरपूर रेल्वे स्थानकावर या कार्यक्रमात उद्घाटन केले जाणारा आ  समाधान आवताडे माजी आ  प्रशांत परिचारक यासह भाजपाचे नेते उपस्थित राहणार आहेत

 

पंढरपूर राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक रेल्वेने पंढरपुरात येतात आलेल्या भाविकांना रेल्वे स्थानकात सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून रेल्वेने अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पंढरपूर रेल्वे स्थानकाचा समावेश केला आहे सुमारे ४० कोटी रुपये खर्च करून रेल्वे स्थानकात अत्याधुनिक सोयी सुविधा देण्यात येणार आहेत या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे यामुळे भाविक प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळणार आहेत पंढरपुरात लांब पडल्याच्या व दररोज पंढरपूर मुंबई रेल्वे गाडी सुरू करावी अशी मागणी भाविकातून होत आहे यामध्ये विश्रांती निवास भक्तनिवास विविध अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत