आगामी २०२४ च्या" निवडणुकीत मला कोणतेही आव्हान" नाही ---आ शहाजी बापू पाटील

.

 
सांगोला  / पंढरपूर /   मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर काठावर निवडून आलेले आमदार शहाजी पाटील यांनी पुन्हा दंड थोपटले आहेत. आगामी विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत माझ्यासमोर कोणाचेही आव्हान नाही. मी हजारोंच्या मताधिक्क्याने २०२४ मध्ये पुन्हा आमदार होणार आहे, असा दावा आमदार शहाजी पाटील यांनी केला. 

सांगोला मतदारसंघातील विविध विकास कामांचे उद्‌घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमानंतर आमदार शहाजी पाटील हे माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यापासून गजानन किर्तीकर आणि रामदास कदम यांच्यामध्ये सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप याबाबत भाष्य केले.

आमदार शहाजी पाटील यांनी २०१९ मध्ये सांगोला मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत पाटील यांचा (स्व.) आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ अनिकेत देशमुख यांच्याशी सामना झाला होता. त्या निवडणुकीत अवघ्या ७६८ मतांनी शहाजी पाटील हे निवडून आले होते.