पंढरपूर न्यायालयात "पेपरलेस कामकाजाला सुरुवात" वकील आणि पक्षकाराला होणार फायदा

.पंढरपूर : आधुनिक तंत्रज्ञान युगात होणाऱ्या अत्याधुनिक बदलाप्रमाणे न्यायंत्रणेत ही अमूल्य ग्राह्य बदल होत आहेत.माननीय सर्वोच्च न्यायालयाचे पक्षकार व वकील इत्यादी करिता उपलब्ध करून दिलेल्या ई-फायलिंग सुविधा प्रमाणे प्रकरणे दाखल होत असताना दुसऱ्या टप्प्यातील तंत्रज्ञानाप्रमाणे पक्षकार व वकील न्यायालयात सर्व स्वरूपाची फौजदारी दिवाणी इत्यादी दाखल होणारी प्रकरणे पेपरलेस दाखल होऊ व करू शकतात .
सदर प्रकरणे विना कागद/ पेपरलेस पद्धतीने न्यायिक चौकशी / सुनावणी अन्वये निकाली होत आहेत त्यामुळे न्यायंत्रणेतील कागदी गठ्ठ्यांची/ फायलींची आवश्यकता राहणार नाही. सदर पेपरलेस प्रकरणामुळे न्यायंत्रणेतील कागदपत्राविरेहित कामकाजामुळे निसर्ग संवर्धनाचे काम होणार आहे व त्याप्रमाणे पारदर्शक न्यायिक कामकाज होणार आहे, असेच काही प्रकरणे पंढरपूर येथील किरण मुरलीधर घाडगे वकील यांनी डिजिटल सिग्नेचर/ सही सह 100% पेपरलेस दाखल केली आहेत त्यापैकी संपूर्णता कागदपत्र विरहित दाखल प्रकरणात पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय श्री महेश लंबे साहेब यांनी पेपरलेस पद्धतीने डिजिटल सिग्नेचर/ सहीद्वारे आदेश केले आहेत.
संपूर्ण भारतात पहिले पेपरलेस एडवोकेट ऑफिस असणारे एडवोकेट किरण मुरलीधर घाडगे पंढरपूर यांनी सोलापूर,उस्मानाबाद,सांगली इत्यादी ठिकाणी शंभर टक्के पेपरलेस प्रकरणे दाखल केली व त्यापैकी काही प्रकरणात निकाल झाले आहेत असे प्रकरणे न्यायालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत/राहणार आहेत. सदर संकेतस्थळावरील डेटा संवर्धनाचे काम माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्याकडून होत आहे. आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीने न्यायिक कामकाजात तिसऱ्या टप्प्यात दूरभाषचित्र प्रणाली द्वारे अर्थात व्हीसीद्वारे प्रकरणाची कामकाज सुविधा पक्षकार व वकील इत्यादी यांना उपलब्ध होणार आहे. मुंबई येथील माननीय उच्च न्यायालयात सदर सुविधा सुरुवात झालेली आहे,सदर सुविधा प्रमाणे पक्षकार व वकील साक्षीदार व प्रकरणाशी संबंधित व्यक्ती यांना मुंबई ठिकाणी प्रत्यक्ष वैयक्तिक हजेरीची आवश्यकता राहत नाही,अशाच प्रकारे न्यायिक कामकाज जिल्हा व तालुका पातळीवरील न्यायालयात होणार आहे सदर कामकाजास सुरुवात झाल्यावर पक्षकार वकील साक्षीदार व प्रकरणाशी संबंधित असणारे इतर व्यक्ती यांचा प्रवास खर्च होणार नाही व अकारण शारीरिक त्रासापासून मुक्तता मिळेल व त्याचबरोबर घरी व ऑफिसमध्ये बसून कामकाज प्रक्रियेत भाग घेता येणार आहे . पेपरलेस प्रकरणात व ई-फायलिंग प्रकरणात दूरचित्रभाष्यप्रणाली/व्हीसी द्वारे एडवोकेट किरण मुरलीधर घाडगे कामकाज करीत आहेत. सदर कामकाजाबाबत व अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधेचा त्यांचा अनुभव खूप छान आहे . सदर कामकाज प्रक्रियेच्या मार्गदर्शनाकरिता माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडून एडवोकेट किरण मुरलीधर घाडगे यांची मास्टर ट्रेनर म्हणून नेमणूक झालेली आहे. सदर सुविधा व त्याकरिताची सर्व यंत्रणेची व्यवस्था प्रत्येक न्यायालयामध्ये न्यायंत्रणेकडून उपलब्ध केलेले आहे तसेच वकिलांना ई-फायलिंग व पेपरलेस कामकाज करण्याकरिता व त्यांच्या सोयीकरता एडवोकेट मिलिंद थोबडे सदस्य व माजी अध्यक्ष यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्र अँड गोवा वकील परिषद मुंबई यांच्याकडून सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयामध्ये सदर सर्व सोयी व तंत्रज्ञानयुक्त सुविधा केंद्र निर्माण झालेली आहेत याकरिता न्यायालयीन शिक्षित कर्मचारी सदर तंत्रज्ञान सुविधा योग्य पद्धतीने यशस्वी करीत आहेत.


