राज्यातील "पाच" कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर उद्योगातून मिळाले "23 हजार 400 कोटी" रुपये


पंढरपूर /..
यंदा राज्यात 206 साखर कारखान्याने गाळप हंगाम सुरू केला आहे सुमारे पाच कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर उद्योगातून 23 हजार कोटी रुपये मिळाले आहेत यंदा दुष्काळी परिस्थिती असताना उसाने शेतकऱ्यांना तारले असल्याचे दिसून येत आहे
यंदा म्हणावा तसा पाऊस पडला नाही यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे पाणी नसल्याने शेतातील पिके जळून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे मात्र नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात चांगला पाऊस झाल्याने उसाचे उत्पादन चांगले निघाले आहे यंदाच्या हंगामात राज्यात 206 साखर कारखान्याने गाळप हंगाम सुरू केला फेब्रुवारी पर्यंत कारखान्यांनी 824 लाख टन उसाचे गाळप केले त्या पोटी २५ ५०० कोटी रुपये एफआरपी देय होती यातील २३ हजार ४४० कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहे अद्याप 114 साखर कारखान्याकडे 2 हजार 65 कोटी रुपये थकबाकी आहे
यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने पिके जळून गेली असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता मात्र उसाने शेतकऱ्यांना साथ दिली असल्याचे दिसून येत आहे


