आता माळशिरस तालुक्यासाठी "एमआयडीसी "प्रयत्न करणार,---- खा रणजितसिंह नाईक निंबाळकर

पंढरपूर / 
सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदार संघात माळशिरस तालुक्यातील मतदारांनी मला एक लाखापेक्षा अधिक मताचे लीड दिले यामुळे मी विजयी झालो मतदारांनी दिलेले मताचे कर्ज फेडण्यासाठी माळशिरस तालुक्यात एमआयडीसी सुरू करणार असल्याची घोषणा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली
माळशिरस येथे तुकाराम देशमुख मित्र परिवारा वतीने खासदार निंबाळकर यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना त्यांनी माळशिरस तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी आपण मिळालेले एक लाख मताचे कर्ज फेडण्यासाठी एमआयडीसी सुरू करणार असल्याची घोषणा केली
माढा लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता मात्र माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील गट व तुकाराम देशमुख गट यांनी एकत्र येऊन मला विजयी करण्यासाठी प्रयत्न केले यामुळे 95 हजार मतांनी मी विजयी झालो माळशिरस तालुक्याने एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य दिल्यामुळे विजय शक्य झाला यामुळे मी माळशिरस तालुक्यांचे कर्ज फेडण्यासाठी काम करणार आहे गेली दहा वर्ष माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार होते मात्र म्हणावं तसे काम झाले नाही यामुळे मतदार नाराज होते त्यांनी निवडणुकीत परिवर्तन घडवून विकासाला चालना दिली
लोकसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर 15 दिवसातच मी आंदोलन करून बारामतीला जाणारे निरा देवधर चे पाणी बंद केले यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला त्यावेळी राज्यात महायुतीची सत्ता होती राज्यातील मोठ्या नेत्याला दिवसल्यामुळे महाविकास आघाडीने पुढे काम करताना मला अडचणीला सामोरे जावे लागले तरीही मी घाबरलो नाही नंतर अडीच वर्षात सत्तांतर होऊन महायुतीची सत्ता आली त्यामुळे आपण पुन्हा जोमाने प्रयत्न सुरू केले गेली शंभर वर्ष रखडलेला पंढरपूर फलटण रेल्वे मार्ग सुरू करण्यासाठी निधीची तरतूद करून घेतली तसेच निरा देवधर योजना मार्गी लावली यामुळे माढा माळशिरस सांगोला पंढरपूर या दुष्काळी तालुक्यांना शेतीसाठी पाणी मिळणार आहे असे खासदार निंबाळकर यांनी सांगितले आगामी निवडणुकीत भाजपने पुन्हा संधी दिली तर निवडणूक लढवून नागरिकांची सेवा करू असे त्यांनी सांगितले