...अखेर "मंगळवेढा उपसा सिंचन" योजनेला मंत्रिमंडळाची मान्यता, आ समाधान अवताडे यांच्या प्रयत्नाला यश, 880 कोटीची तरतूद

.

 

पंढरपूर :-  
गेल्य४० वर्षांपासुन प्रलंबीत असलेली अखेर मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला राज्य मंत्री मंडळाची 880 कोटीच्या मान्यता मिळाल्याची माहिती पंढरपूर - मंगळवेढ्याचे आमदार समाधान दादा आवताडे यांनी दिली.  शुक्राचार्य बाजूला झाल्यामुळे या योजनेला मंजुरी मिळाली त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात फटाक्याची फोडून आनंद व्यक्त करण्यात आला

 मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
2009 मध्ये लोकसभा विधानसभेपासून निवडणूकीवर या 24 गावांनी बहिष्कार टाकला होता. त्यावेळी पासून हा प्रश्न ऐरणीवर आला होता. आगामी लोकसभा निवडणूकीवर देखील बहिष्कार टाकण्याचा इशारा या 24 गावांनी दिला होता. त्याचं प्रमाणे पाणी न दिल्यास कर्नाटका जाण्याचा इशारा देण्यात आला होता. शुक्रवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामेय्या यांची भेट घेण्यासाठी 24 गावातील शेतकरी जाणार होते. या योजनेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवताडे शुगर कार्यक्रमात शब्द दिला होता या योजनेसाठी आपण निधी मिळवून देऊ त्यामुळे त्यांनी आजच्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत  योजनेला मान्यता देण्यात आली आहे
ही योजना मंजूर व्हावी यासाठी आमदार समाधान  आवताडे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.
या निर्णयाचे मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. याबाबत एबी न्यूज लाईन ने पाठपुरावा केला होता याची दखल राज्य शासनाने व आमदार समाधान आवताडे घेतली