कोणत्याही परिस्थितीत 'संविधान' बदलता येत नाही -माजी आ प्रशांत परिचारक

पंढरपूर /...
सोलापूर लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना विजयी करण्यासाठी माझी आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर शहरात प्रभाग बैठकावर भर दिला आहे विरोधकाकडून संविधानात बदल करण्यात येणार असल्याचा अपप्रचार करण्यात येत आहे तरी मतदारांनी विश्वास न ठेवता भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना विजयी करावे असे आवाहन माझी आमदार प्रशांत परिचारक यांनी केले
सोलापूर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढविण्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहेत यामुळे भाजपने त्यांच्यावर माढा लोकसभा मतदारसंघात प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे यामुळे परिचारक यांनी लोकसभा निवडणुकीत सहभाग घेतला असून गावागावात वाड्यावर जाऊन ते प्रचार करत आहेत सोलापूर लोकसभा मतदार संघात पंढरपूर शहराचा समावेश आहे यामुळे परिचारक यांनी पंढरपूर आतील प्रभागात बैठका घेऊन आमदार राम सातपुते यांचा प्रचार करण्यास सुरुवात केली आहे ते म्हणाले सोलापूर येथे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सभा झाली यावेळी गांधी यांनी भाजप सत्तेवर आल्यास संविधान बदलणार असल्याचे सांगितले मात्र सुप्रीम कोर्टाने 50 वर्षांपूर्वी निकाल दिला असून कोणालाही संविधान बदलता येणार नसल्याचे सांगितले आहे असे असताना विरोधक अपप्रचार करत आहेत तर 370 कलम सांगून मुस्लिम बांधवांना भीती घालण्यात येत आहे तरी मतदारांनी घाबरून न जाता आमदार राम सातपुते यांना विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांसाठी संविधान मधील कायद्यात बदल केले आहेत त्यानुसार आर्थिक मागास असलेल्या समाजासाठी दहा टक्के आरक्षण देण्यात येणार आहे आगामी 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यात येणार आहे तसेच 370 कलम रद्द केले आहे हे तीन बदल केल्यामुळे देशातील नागरिकांचा फायदा झाला आहे मात्र विरोधकाकडून अपप्रचार करण्यात येत आहे तरी विरोधकांच्या उपप्रचाराला बळी न पडता भाजपचे सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघातील उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन परिचारक यांनी केले


