'वारकरी साहित्य' परिषदेच्या वतीने 'संत चोखामेळा' पुण्यतिथी निमित्त भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचे ३१ मे रोजी पंढरीत आयोजन


पंढरपूर / श्री संत चोखामेळा पुण्यतिथी निमित्त वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने येत्या 31 मे रोजी पंढरपूर येथे भक्ती संगीत कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात गरीब महिलांना साडी वाटप केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती साहित्याची परिषदेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल पाटील उर्फ काकाजी यांनी दिली.
दरवर्षी संत चोखामेळा यांच्या पुण्यतिथीनिमित्त वारकरी साहित्य परिषदेच्या पंढरपुरात वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन पंढरपुरात करण्यात येते. यंदा वर्षी वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने गरीब महिलांसाठी साडी वाटप कार्यक्रम आणि भक्ती संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून हा कार्यक्रम मंदिराजवळील संत जगद्गुरु तुकाराम भवन येथे दुपारी ४ वाजता होणार आहे
या कार्यक्रमास मंदिर समितीचे ह भ प सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर ह भ प संजय महाराज देशमुख ह भ प माधव महाराज शिवणीकर अँड कीर्तीपाल सर्वगोड उपस्थित राहणार आहेत तरी वारकरी बांधूनी भाविकांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावे असे आवाहन वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी केले आहे.


