ब्रेकिंग न्यूज --- भाजपचे आ रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी 'पक्षविरोधी' काम केले त्यांची 'आमदारकी रद्द' करावी भाजपची मागणी

पंढरपूर / माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी ने महायुतीचा धर्म पाळला नाही शिष्टमंडळाने दिला अहवाल....आज सातारा येथे भाजप जिल्हा पदाधिकारी ची बैठक पश्चिम संघटन महा मंत्री
मा. मकरंद भाऊ देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी माझी आमदार मदनदादा भोसले , युवा नेते मनोज घोरपडे संघटनेचे सर्व पदाधिकारी. मंडल अध्यक्ष उपस्थित होते यावेळी माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीतल राष्ट्रवादी पक्षाने खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात काम केले मुळेच आपला पराभव झाला असे मत सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या
लोकसभा परमावाची कारणे व भाजप विरोधी काम केलेल्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचे निलंबन करावे असा मागणी लिखित स्वरूपात केली.यावेळी पुर्व मंडल अध्यक्ष बजरंग गावडे, पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल ससते शहराध्यक्ष अनुप शहा , ज्येष्ठ नेते विश्वासराव भोसले गट नेते अशोकराव जाधव नगरसेवक सचिन अहिवळे संजय गायकवाड संदीप चोरमले सोपानराव जाधव शरद झेंडे , उपस्थित होते यावेळी बोलताना जयकुमार शिंदे म्हणाले की
लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या वरिष्ठ नेते मंडळींनी खासदार श्री रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली, त्याबद्दल पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपले आभारी आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये खूप चांगले काम केले कोरोनाचा काळ, विरोधी सरकार यामुळे रखडलेले सर्व प्रश्न आपल्या सरकारच्या माध्यमातून मार्गी लागले. भाजप संघटनेमध्ये खासदारांनी वेळ देऊन संघटनेला ही बळ देण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्वच अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत. व्यक्तिगत संवाद थोड्याफार प्रमाणात कमी पडला. परंतु त्यांनी केलेलं काम हे मतदार संघातील जनता विसरणार नाही. हे जरी सत्य असलं तरी सुद्धा आपल्याच पक्षामध्ये राहून, ज्यांना भाजपने म्हणजे रणजीतसिंह मोहिते-पाटील यांना आमदार केलं, त्यांच्या बंद पडलेल्या कारखान्याला मदत केली, त्यांनी घरातील उमेदवारामुळे पक्षाचे काम केले नाही. त्यांनी घराला प्राधान्य दिले. पक्ष हीत महत्त्वाचे मानले नाही. त्यांनी उघडपणे भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केला, त्यामुळे त्यांच्यावर व त्यांच्या कार्यकर्त्यावर पक्षशिस्त ची कारवाई होऊन त्यांची आमदारकी रद्द करावी. अन्यथा सर्वसामान्य भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्ते व जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल. भविष्यात कोणीही काही करेल याचा फटका सोलापूर जिल्ह्यातील भाजपला आगामी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेवर होईल. त्यामुळे तातडीने निलंबन करावे ही विनंती.
राष्ट्रवादी अजित दादा गट, माढा मतदारसंघातील महायुतीचे घटक पक्षातील राष्ट्रवादीने संपूर्ण मतदारसंघांमध्ये विरोधात काम केले आहे. तुतारी बरोबर करमाळा, माढा, सांगोला या ठिकाणचे आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजय शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे यांनी उघडपणे भविष्यातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तडजोडी केलेल्या आहेत. त्यामुळे त्या मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला लीड मिळण्या ऐवजी तुतारीला लीड मिळाले आहे. कारण सांगत असताना शरद पवार यांच्या बद्दल सहानुभूती व मराठा आंदोलन यावर खापर फोडले जात आहे. प्रत्यक्षात त्यांचे कार्यकर्ते विरोधात काम करत होते.
फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी अजित दादा गटाचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष संजीव राजे निंबाळकर व त्यांचे कुटुंबीय व सर्व पदाधिकारी यांनी उघडपणे जाहीर रित्या सभा घेऊन महायुतीचा धर्म पाळला नाही. त्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडून आल्यास फलटण तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष ग्रामपंचायत पासून ते आमदारकी पर्यंत सर्व निवडणूक जिंकेल या दृष्टीने विचार करून आपल्याला पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर याची गांभीर्याने दखल घेऊन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई कशा पद्धतीने होईल हे पहावे व त्यांच्या कार्यकर्त्यांना महामंडळ शासकीय कमिटी वर कोठेही त्यांची वर्णी लागू नये याची दखल घेतली जावी. अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खूप काहीतरी सहन करावे लागेल याचाही विचार व्हावा ही विनंती.
खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी पराभव झाल्यानंतर कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कार्यकर्त्यांचा मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत व वैयक्तिक झालेल्या चुका सुधारून पक्ष वाढीसाठी जे काय करता येईल ते करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या घरोघरी जाऊन कार्यकर्त्यांचं मत जाणून घेत आहेत. तसेच जिल्हा परिषद मतदार संघ निहाय प्रमुख पदाधिकारी गावनिहाय बैठका घेऊन बूथ सक्षमीकरण करण्यासाठी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. त्यामुळे भविष्यातील फलटणचा आमदार हा भारतीय जनता पक्षाचा असेल, यासाठी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी मंत्री यांनी स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांना कसल्याही पद्धतीची मदत होता कामा नये याची काळजी घ्यावी. ही विनंती भविष्यातील सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार केल्यास भारतीय जनता पक्षाने आता नवीन रणनीती आखणं खूप गरजेचं आहे. सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष संघटनेमध्ये काही बदल व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व अन्य लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांना राजकीय ताकद देऊन जे विकासासाचे प्रश्न उदा. सिंचन, रेल्वे राहिलेले आहेत ते मार्गी लावण्यासाठी व आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप चे उमेदवार जिंकण्याचे ध्येय ठेवावे लागेल. तरी न्याय दयावा.यावेळी अनुप शहा, सोपानराव जाधव, विश्वासराव भोसले यांनी मनोगत व्यक्त केली .यावेळी सरचिटणीस , भाजरचे नेत्या सौ प्रियाताई शिंदे, विठ्ठल बलशेठवार , संतोष कणसे , सागर शिवदास , रणजीत जाधव, विशाल नलवडे व जिल्हा तील भाजप पदाधिकारी उपस्थित होते.


