माथाडी कामगारांमध्ये 'बांगलादेशी' शिरले हा देशाला 'धोका ' .- नरेंद्र पाटील

पंढरपूर / .माथाडी कामगारांमध्ये बांगलादेशी शिरले हा देशाला धोका नरेंद्र पाटील
महाराष्ट्रात मोठमोठे उद्योग व्यवसाय असल्यामुळे येथे नोकरी करण्यासाठी बांगलादेशीय नागरिक आले आहेत हे नागरिक माथाडी कामगार म्हणून काम करत आहे यामुळे बांगलादेशीय नागरिकांकडून देशाला धोका असल्याचे मराठा समाजाचे नेते नरेंद्र पाटील यांनी सांगितले
महाराष्ट्र सुजलाम सुफलाम असल्यामुळे व येथे मोठमोठे उद्योग व्यवसाय असल्याने नोकरीच्या अनेक संधी आहेत यामुळे परप्रांतीय नागरिक मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात आले आहेत यात बांगलादेशीय नागरिक माथाडी कामगार म्हणून महाराष्ट्रात काम करत आहेत या बांगलादेशीय नागरिकांना काहीजण आधार कार्ड पॅन कार्ड मिळवून देऊन मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत यामुळे बांगलादेशीय नागरिकापासून देशाला धोका निर्माण होऊ शकतो असे नरेंद्र पाटील यांनी सांगितले
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मते मिळविण्यासाठी नेत्यांनी कोणतेही काम करू नये बांगलादेशीय नागरिकापासून सावध राहावे असे पाटील यांनी सांगितले


