लाडक्या 'बहिणीसाठी' मनसेचा एक हात पुढे 'दिवाळीचे' वस्तू एका छताखाली मिळणार -- दिलीप धोत्रे

.दिवाळी खरेदी एकाच छताखाली
मनसे आद्य वीरशैव महिला मंडळ चा उपक्रम
पंढरपूर / आद्य वीरशैव महिला मंडळ पंढरपूर व मनसे यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिवाळी खरेदी एका छताखाली या एक्सपो मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे यासाठी इच्छुकांनी 5 ऑक्टोबर पर्यंत नावे नोंदणी करावीत असे आवाहन मनसेचे नेते दिलीप धोत्रे व डॉक्टर शोभा कराळे यांनी केले आहे
दिवाळीत नागरिक विविध वस्तूंची खरेदी करतात यासाठी त्यांना वेगवेगळ्या दुकानात जावे लागते यामुळे वेळ वाया जातो व म्हणावी तशी खरेदी होत नाही म्हणून यंदाच्या वर्षी मनसे व वीरशैव महिला मंडळ पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदान येथे भव्य एक्सपो मेळावा भरविण्यात येणार आहे या मेळाव्यात कपडे खाद्यपदार्थ गृहपयोगी वस्तू आकाश कंदील रांगोळी अशा विविध प्रकारचे स्टॉल उभा करण्यात येणार आहे यासाठी नावे नोंदणी मनीषा वास्कर मोबाईल नंबर 70 20 30 77 94 व सुवर्णा स्वामी मोबाईल नंबर 90 28 88 0049 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे


