आमदार अवताडेंकडून 'विकास कामाचे' डिजिटल प्रत्येक गावात विरोधकाचे 'तोंड बंद'

आमदार अवताडे यांच्याकडून प्रत्येक गावात विकास कामाचे फलक पःढपपष पंर
पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात आमदार समाधान आवताडे यांनी कोट्यावधी रुपयाची विकास कामे केली आहेत ही कामे जनतेपर्यंत पोहोचावीत म्हणून आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येक गावात डिजिटल फलक लावून कोणती विकासकामे केली याची माहिती दिली आहे या फलकाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात पुन्हा निवडणूक लढविण्याची तयारी आमदार समाधान अवताडे यांनी सुरू केली आहे गेल्या सहा महिन्यापासून ते पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील वाड्यावर जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेऊन अडीअडचणी जाणून घेत आहेत त्या सोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येक गावात आमदार समाधान आवताडे यांनी पाच ते वीस कोटी रुपया पर्यंत निधी दिला आहे यातून अनेक विकास कामे करण्यात आली आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार संघात व गावात केलेल्या विकास कामाची माहिती मतदारापर्यंत पोहोचावी म्हणून आमदार समाधान आवताडे यांनी प्रत्येक गावात डिजिटल फलक लावून कामाची माहिती सादर केली आहे या माध्यमातून त्यांनी मतदारांची संपर्क साधने सुरू केले आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत आहे यामुळे या मतदार संघात महाविकास आघाडी कडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागले आहे


