सर्वसामान्य 'जनतेची' कामे केल्यामुळे जनता माझ्या पाठीमागे' खंबीरपणे उभे -मनसे नेते दिलीप धोत्रे

.सर्वसामान्य जनतेची कामामुळे मतदार साथ देणार दिलीप धोत्रे 
गावभेट दौरा सुरू 
पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात अनेक नागरिकांना मदत करून गोरगरिबांचे प्रश्न सोडविले आहेत यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदार आपणाला मतदान करून साथ देणार असल्याचे माहिती पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी दिली 
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी तीन ते सहा ऑक्टोबर या कालावधीत गावभेट दौरे सुरू केले आहेत याचा प्रारंभ घटस्थापने दिवशी तीन ऑक्टोंबर रोजी खर्डी येथील सिताराम महाराज यांचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडण्यात आला यावेळी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पत्रकारांशी बोलताना दिलीप धोत्रे म्हणाले गेल्या अनेक वर्षापासून कोणतीही सत्ता आपल्याजवळ नसताना आपण पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील गोरगरिबांचे प्रश्न सोडविले आहेत अनेकांना मदत केली आहे विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क साधला आहे यामुळे माझ्या कामाची दखल घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत मतदार आपणाला साथ देणार आहे गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याचा म्हणावा तसा विकास झाला नाही लोकप्रतिनिधींनी स्वार्थासाठी पदे घेतली अशी टीका करून दिलीप धोत्रे म्हणाले यंदाच्या निवडणुकीत मतदार स्वार्थी लोकप्रतिनिधींना धडा शिकवतील