भगीरथ भालके गैरसमज पसरू नये, स्व भारतनानाचा भालके फोटो लावूनच प्रचार करणार -- मनसे नेते दिलीप धोत्रे

.पंढरपूर भगीरथ भालके यांनी गैरसमज पसरवू नये मनसे उमेदवार धोत्रे
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी कैलासवासी आमदार भारत नाना भालके यांचा फोटो लावून प्रचार करण्यास सुरुवात केली आहे यामुळे त्यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांनी मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्यावर टीका केली होती मात्र स्वर्गवासी आमदार भारत नाना भालके हे आपले नेते होते यामुळे त्यांचा फोटो लावून आपण प्रचार करणार आहे मात्र भगीरथ भालके यांनी मतदारात गैरसमज पसरू नये असे मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी सांगितले
मनसे कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिलीप धोत्रे बोलत होते यावेळी माजी नगरसेवक मोहम्मद उस्ताद एडवोकेट यासीन शेख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे म्हणाले गेल्या वीस वर्षापासून विठ्ठल परिवाराशी माझा संबंध आहे कैलासवासी आमदार भारत नाना भालके यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे ते माझे नेते आहेत व पुढेही राहणार आहे यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मी प्रचार करताना कैलासवासी आमदार भारत नाना भालके यांचा फोटो लावून प्रचार करणार आहे मात्र हा प्रचार करत असल्यामुळे मतदारांचा मला पाठिंबा मिळत आहे म्हणून भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके हे मतदारात गैरसमज पसरविण्याचा प्रकार करत आहेत मात्र मतदार सुज्ञ आहेत पंढरपूर शहर व तालुक्यात आपण अनेक कामे केली आहेत गोरगरिबांना मदत केली आहे विविध कार्यक्रम घेऊन अनेकांचा सत्कार केलेला आहे यामुळे मी केलेले काम मतदारापर्यंत पोहोचलेले आहे याचा फायदा मला निवडणुकीत होणार आहे मात्र भालके यांनी मतदारात गैरसमज पसरवू नये असे धोत्रे यांनी सांगितले
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात मनसेने दिलीप धोत्रे यांना उमेदवारी दिली आहे धोत्रे यांनी गेल्या तीन महिन्यापासून निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात भगीरथ भालके निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत मात्र त्यांना अद्याप कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिलेली नाही


