या विधानसभा मतदारसंघातील 'इच्छुक' उमेदवार काय करतात ते पहा..

.पंढरपूर /..
मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुक उमेदवारांची धडपड सुरू
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत आहे यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुती कडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागले आहे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे मात्र त्यांनी अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही यामुळे परिचारकांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे या मतदार संघातील इच्छुक उमेदवार आमदार समाधान आवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत मनसेचे दिलीप धोत्रे यांनी मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी धडपड सुरू केली असल्याचे दिसून येत आहे
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार समाधान अवताडे यांना भाजपकडून पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याने आमदार समाधान आवताडे यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे आमदार अवताडे यांना अडीच वर्षाचा कार्यकाळ मिळाला या कार्यकाळात त्यांनी अनेक विकासाची कामे केली आहे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात वीज रस्ते पाणी या कामासाठी शासनाकडून 3000 कोटी रुपयाचा निधी आणला आहे गेल्या 30 वर्षापासून रखडलेली मंगळवेढ्यातील उपसा सिंचन योजना व पंढरपुरातील एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावला आहे या दोन्ही कामाचा शुभारंभ करण्यासाठी मंगळवेढा येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आले होते यावेळी फडवणीस यांनी शेतकरी मेळाव्यात निवडणुकीत पुन्हा आमदार समाधान आवताडे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत आमदार समाधान आवताडे यांनी मतदार संघात विविध कार्यक्रम घेऊन मतदारांची संपर्क ठेवणे सुरू केले आहे वाड्यावर जाऊन एक दिवस मुक्काम करून मतदारांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडण्यास सुरुवात केली आहे रक्षाबंधन कार्यक्रम घेऊन महिलांना विविध बक्षिसे देण्यात आली आहे यामुळे महिलातून समाधान व्यक्त होत आहे विकास कामाच्या जोरावर आपण पुन्हा विजयी होणार असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले आहे सध्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात आमदार समाधान आवताडे यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे त्यांनी विरोधकांना चोख उत्तर देण्यासाठी प्रत्येक गावाच्या वेशीवर केलेल्या कामाचे डिजिटल फलक लावले आहेत पंढरपूर राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्यामुळे पंढरपूरत आलेल्या भाविकांना विठ्ठलाचे सुकर दर्शन व्हावे म्हणून शासनाकडे पाठपुरावा करून 150 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला आहे यातून दर्शन मंडप वस काय उभारण्यात येणार आहे आमदार अवताडे यांनी मतदार संघातील नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यास सुरुवात केली असल्याने मतदारातून समाधान व्यक्त होत आहे
परिचारकांच्या भूमिकेकडे लक्ष
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत आमदार समाधान आवताडे यांना भाजपची उमेदवारी मिळवून देण्यापासून ते विजयी करण्यापर्यंत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सहकार्य केले मात्र काही कारणामुळे गेल्या दोन वर्षापासून आमदार समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत हे मतभेद मिटविण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी एक पाऊल पुढे टाकून गेल्या वर्षी दसरा सणा दिवशी परिचारक यांच्या वाड्यावर जाऊन त्यांना सोने देऊन मतभेद मिटविण्याचा प्रयत्न केला मात्र परिचारक यांच्याकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात परिचारक गटाची ताकद असल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत माजी आमदार शांत परिचारक यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे सध्या सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीची ताकद असल्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिचारक यांना हातात तुतारी घेऊन निवडणूक लढवावी अशी मागणी केली आहे परिचारक यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली तर मंगळवेढा येथे काही कार्यकर्त्यांनी भाजपचे पक्ष निरीक्षक अनिल लांडगे यांची भेट घेऊन परिचारक यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे मंगळवेढा येथे विविध विकास कामाचा शुभारंभ करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आले होते यावेळी परिचारक यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविले यामुळे परिचारक हे भाजपला सोडचिट्टी देऊन हातात तुतारी घेणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती मात्र परिचारक यांनी सोलापूर व अक्कलकोट येथील भाजपच्या कार्यक्रमास हजेरी लावली यामुळे परिचारक भाजप सोडणार नाहीत हे निश्चित झाले आहे परिचारक यांनी कोणतीही भूमिका जाहीर केली नसल्याने त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व काँग्रेसकडून ऑफर आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे विधानसभा निवडणुकीची तयारी विविध उमेदवारांनी सुरू केली आहे मात्र अद्याप परिचारक यांनी कोणतीही भूमिका जाहीर केली नाही यामुळे परिचारक यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे
भालके यांची निवडणुकीची तयारी
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात आमदार कैलासवासी भारत भालके तीन वेळा विजयी झाले आहेत त्यांनी दोन्ही तालुक्यात विकासाची कामे केली आहेत अनेक गोरगरिबांना मदत केली आहे यामुळे भालके यांचा गट निर्माण झाला आहे यामुळे आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी भगीरथ भालके यांनी सुरू केली आहे त्यांनी जन आशीर्वाद यात्रा सुरू करून प्रत्येक गावात जाऊन मतदारांचा आशीर्वाद घेऊन अडीअडचणी जाणून घेण्यास सुरुवात केली आहे भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळावी म्हणून खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे तसेच पुणे येथे झालेल्या मुलाखतीस हजेरी लावली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भगीरथ भालके यांनी महा विकास आघाडी चे उमेदवार खासदार धर्यशील मोहिते पाटील व खासदार प्रणिती शिंदे यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न केले आहे यामुळे भालके यांना उमेदवारी देण्यासाठी काँग्रेस कडून प्रयत्न करण्यात येत आहेत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस असल्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या आदेशानुसार भलके यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची संकेत मिळत आहेत
अनिल सावंत यांची प्रचारात आघाडी
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात भैरवनाथ शुगरचे व्हॉइस चेअरमन अनिल सावंत यांनी उभा राहण्याची तयारी सुरू केली आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली आहे मात्र खासदार पवार यांनी या मतदार संघात कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही अनिल सावंत यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे या मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे म्हणून मेळाव्याचे आयोजन केले होते यास चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून आले हजारो तरुणांच्या हाताला काम मिळाले आहे यामुळे तरुणांमधून समाधान व्यक्त होत आहे महिलांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते यास महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे
मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांची प्रचारात आघाडी
मनसेने यंदाची विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिला उमेदवार दिलीप धोत्रे यांची नाव जाहीर केले आहे यामुळे दिलीप धोत्रे यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे गेल्या पाच वर्षापासून दिलीप धोत्रे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात विविध कार्यक्रम घेऊन मतदारांची संपर्क ठेवत आहेत कोरोना काळात त्यांनी अनेक गोरगरिबांना मदत केली आहे डॉक्टर वकील इंजिनिअर यांचा सत्कार समारंभ केला आहे तसेच राज्यातील शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी गुणवंत शिक्षकांचा सत्कार पंढरपुरात केला आहे विविध कार्यक्रम घेऊन मतदारांशी ते संपर्क ठेवत आहे पंढरपुरात कॉरिडॉर करण्याचा निर्णय शासनाने घेतला यास दिलीप धोत्रे यांनी विरोध दर्शवून नागरिकांना घेऊन आंदोलन केले पंढरपूर नगर परिषदेने करात वाढ केली होती ही करवाड दिलीप धोत्रे यांनी शासन दरबारी जाऊन रद्द करून आणली आहे सध्या दिलीप धोत्रे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांचे कार्यकर्ते वाड्या वस्त्यावर जाऊन मतदारांची संपर्क साधून धोत्रे यांनी केलेल्या कार्याची माहिती देत आहेत तरुणांचा चांगला पाठिंबा दिलीप धोत्रे यांना मिळत असल्याचे दिसून येत आहे
एकंदरीत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात आमदार समाधान आवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असल्याचे दिसून येत आहे भाजपकडून आमदार समाधान आवताडे यांना उमेदवारीची संकेत मिळत आहेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागले आहे


