मतदारसंघात विकास कामे केली 'जनता आपल्या पाठीमागे 'आहे त्यामुळे कुणाचे 'आव्हान' वाटत नाही --आ समाधान आवताडे

. पंढरपूर जनता मागे असल्याने निवडणुकीत कोणाचेही आव्हान समोर नाही आमदार अवताडे
आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे यामुळे यंदाच्या निवडणुकीत आपणासमोर कोणाचे आव्हान असणार असे पत्रकारांनी आमदार समाधान आवताडे यांना विचारले असता अवतारी म्हणाले जनता मागे असताना कोणाचे आव्हान आपल्यासमोर नाही यामुळे यंदाच्या निवडणुकीत आपला विजय निश्चित असल्याचे सांगितले
मंगळवेढा तालुक्यात विविध विकास कामाचे उद्घाटन आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले गेल्या 30 वर्षापासून पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील अनेक प्रश्नावर लोकप्रतिनिधींनी राजकारण करून मते मिळवली आहेत मात्र आपण पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक मतदार संघाचा विकास करण्यासाठी लढविली तीन वर्षात शासनाकडून 3000 कोटी रुपयांचा निधी आणून अनेक गावात विकास कामे केली आहेत मंगळवेढा येथील उपसा सिंचन योजना व पंढरपूर येथील एमआयडीसी चा प्रश्न मार्गी लावला आहे मतदार संघात विकासाची कामे झाल्यामुळे मतदार खुश आहेत आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्यासमोर माजी आमदार प्रशांत परिचारक की विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यापैकी कोणाचे आव्हान असणार आहे असे विचारले असता आमदार अवताडे म्हणाले या मतदार संघात अनेक विकासाची कामे केली आहेत यामुळे जनता माझ्यामागे असल्याने कोणाचेही आव्हान माझ्यासमोर नाही


