माढा विधानसभा मतदारसंघात चेअरमन अभिजीत पाटील यांनी विद्यमान आमदार बबनदादा शिंदे समोर केले तगडे आव्हान उभे

.  पंढरपूर             

माढा विधानसभा मतदार संघात आमदार बबनदादा शिंदे समोर चेअरमन अभिजीत पाटील यांचे तगडे आव्हान 
माढा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागले होते अखेर या मतदार संघात खासदार शरद पवार यांनी विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे यामुळे या मतदार संघात गेली तीस वर्षे काम करत असलेले आमदार बबनदादा शिंदे यांच्यासमोर तगडे आव्हान उभे राहिले आहे 
माढा विधानसभा मतदार संघात पंढरपूर तालुक्यातील 42 गावांचा समावेश आहे या गावात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे हजारो सभासद आहे यामुळे माढा विधानसभा मतदारसंघात याचा फायदा होणार असल्याने विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी माढा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची तयारी गेल्या सहा महिन्यापासून सुरू केली आहे त्यांनी ऊसाला सर्वाधिक दर जाहीर केला आहे या मतदारसंघात विविध कार्यक्रम घेऊन मतदारांशी संपर्क ठेवला आहे या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारी मिळावी म्हणून पुणे येथे मुलाखत ही दिली आहे तसेच अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे यांनी आपले सुपुत्र रणजीत सिंह शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळावी म्हणून खासदार शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी होती यामुळे या मतदार संघातून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागले होते गेल्या काही दिवसापासून या मतदार संघातून भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये घेऊन त्यांना उभे करण्याची तयारी सुरू होती यामुळे या मतदारसंघाबाबत उत्सुकता वाढली होती उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस असताना सोमवार पर्यंत उमेदवारी जाहीर करण्यात आली नव्हती यामुळे कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागले होते सोमवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना उमेदवारी दिली असल्याचे जाहीर करण्यात आले यामुळे आता माढा विधानसभा मतदार संघात गेली तीस वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असलेले आमदार बबनदादा शिंदे यांच्यासमोर चेअरमन अभिजीत पाटील यांचे आव्हान उभे राहणार आहे