तालुक्यातील तालुक्यातील 11 ग्रामपंचायत पैकी विठ्ठल परिवाराला सात तर पांडुरंग परिवाराला चार ग्रामपंचायत वर्चस्व

. तुंगत ग्रामपंचायत मध्ये परिचारक गटाला धक्का
: पंढरपूर तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीसाठी चुरशीने मतदान सुमारे ८७% झाले होते. पंढरपूर येथील तहसील कार्यालयात आज सकाळी तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी पूर्ण झाली. यामध्ये तुंगत, मेंढापूर या मोठ्या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता मिळवली आहे, तर दुसरीकडे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांना धक्का बसला आहे. त्यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या लगतच्या पुळूजवाडी ग्रामपंचायतीवर विरोधी परिचारक गटाने सत्ता मिळवली आहे.: तालुक्यातील तुंगत ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित, कल्याणराव काळे, भगिरथ भालके यांच्या गटाने सत्ता मिळवली आहे. भाजपच्या परिचारक गटाच्या ताब्यातून राष्ट्रवादी काँग्रेसने ही सत्ता खेचून आणली आहेतालुक्यातील एकूण ११ पैकी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, कल्याणराव काळे, भगिरथ भालके यांच्या गटाने सर्वाधिक सात ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली आहे. भाजप पुरस्कृत माजी आमदार प्रशांत परिचारक गटाला केवळ चार ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविता आली आहे. तालुक्याची 11 ग्रामपंचायत या माढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार बबन दादा शिंदे यांना याचा फायदा होणार आहे



