आत्मनिर्भर भारत अंतर्गत शेतकऱ्यांसाठी नाँनो युरिया बनवणार केंद्रीय राज्यमंत्री भागवंत खुबा

अक्षय ऊर्जा क्षेत्रात २०२४ पर्यंत १२ लाख नवे रोजगार तयार होणार असल्याची माहिती केंद्रीय अक्षय ऊर्जा आणि रासायनिक खते राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी दिली आहे. आज त्यांनी आपल्या कुटुंबीयांसह श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन घेतले. युरीया निर्मिती बाबतीत आपला देश लवकरच आत्मनिर्भर होत असून नॅनो युरीया तयार होणार असल्याने शेतकऱ्यांना फायदा होईल अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री खूबा यांनी दिली
भारत सरकारकडून लवकरच देशातील तीर्थक्षेत्रांसाठी चांगल्या दर्जाची वीज अक्षय ऊर्जेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे याबाबतचा प्रकल्प देखील लवकरच कार्यरत होईल असे प्रतिपादन केंद्रीय अक्षय ऊर्जा व रासायनिक खते निर्मिती राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी पंढरपुरात केले.
तसेच शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या युरिया बाबत भारत सरकार आत्मनिर्भर होत आहे. लवकरच नाँनो युरियाची देखील निर्मिती आत्मनिर्भर भारत करेल. आणि शेतकऱ्यांसाठी एक नवीन वरदान होईल. सेंद्रिय शेती व रासायनिक शेती अशा दोन्ही पद्धतीच्या शेती भारतात चालतात. या दोन्ही पद्धतीच्या शेतीला समतोल राखत लवकरच शेती निर्मितीकडे लागणारा रासायनिक खतांच्या बाबत आणि सौर ऊर्जा व सौर ऊर्जा प्रकल्पांच्या बाबत देखील भारत आत्मनिर्भर झाला आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.


